मुंबई – बॉलिवूड आणि क्रिकेट या दोन क्षेत्रातील संबंध अगदी जवळचा आहे. अनेक क्रिकेटपटूंच्या पत्नी या अभिनेत्री आहेत. यामध्ये अलिकडचं उदाहरण घेतलं तर अनुष्का शर्मा आणि विराट कोहलीचा विवाह झाला. तर जहीर खान याने देखील अभिनेत्री सागरिका घाटगे हिच्याशी लग्न केलं. आता दक्षिणात्य अभिनेत्री अनुष्का शेट्टी हिने आपल्या क्रिकेटपटू क्रशविषयी सांगितलं.
‘बाहुबली’ चित्रपटाच्या माध्यमातून घराघरात पोहोचलेली देवसेना अर्थात अभिनेत्री अनुष्का शेट्टी सध्या तिने दिलेल्या एका मुलाखतीमुळे चर्चेत आली आहे. या मुलाखतीत तिने दिग्गज क्रिकेटपटू राहुल द्रविड तिचं क्रश असल्याचं सांगितलं आहे. तरी देखील राहुलला अजुन एकदाही न भेटल्याचं तिने म्हटलं आहे.
राहुल द्रविड हा माझा आवडता क्रिकेटर आहे. फक्त क्रिकेटर नाही तर एक असा काळ होता ज्यावेळी मी त्याच्या प्रेमात पडले होते. तो माझा क्रश होता. परंतु, अजूनही आम्ही कधीच भेटलो नाही, असं ती म्हणाली.
सध्या राहूल द्रविड क्रिकेटमधून निवृत्त झाला आहे. मात्र त्याची आता भारतीय क्रिकेट संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे.