नवी दिल्ली – सध्या अभिषेक बच्चन त्याच्या ‘दसवी’ चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटाचा ट्रेलर देखील रिलीज झाला आहे. या ट्रेलरने येताच सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. चाहतेही अभिषेक आणि चित्रपटाबद्दल ट्विट करत आहेत, तर अमिताभ बच्चन यांच्या एका ट्विटने इंटरनेटवर धुमाकूळ घातला आहे. होय, या ट्विटचा बोलबाला असला तरी अमिताभ बच्चन यांनी या ट्विटमध्ये आपल्या उत्तराधिकारीची घोषणा केली आहे.
खरं तर, मेगास्टार अभिषेकच्या ‘दसवी’ चित्रपटाचा ट्रेलर पाहून ते खूप प्रभावित झाले आहेत. हा ट्रेलर पाहिल्यानंतर अमिताभ यांनी ट्विटरवर आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. त्यांनी हरिवंशराय बच्चन यांची एक कविता शेअर केली, ‘माझी मुलं, मुलं असल्याने माझे उत्तराधिकारी नाही होणार, जे माझे उत्तराधिकारी असतील ती माझी मुलं असतील’, अशा आशयाच्या हरिवंश राय बच्चन यांनी लिहिलेल्या ओळी पोस्ट करत त्यांनी पुढे अभिषेकसाठी लिहिलं, ‘अभिषेक, तू माझा उत्तराधिकारी आहेस, बस कह दिया तो कह दिया’| या ट्विटमध्ये त्यांनी अभिषेकच्या दसवीचा ट्रेलरसुद्धा शेअर केला आहे. या चित्रपटात अभिषेकसोबत यामी गौतम आणि निम्रत कौर यांच्या मुख्य भूमिका आहेत. वडिलांच्या या ट्विटवर अभिषेकने लिहिलं, ‘लव्ह यू पा, नेहमीच’.
T 4230 – https://t.co/tTX69tWAc6
"मेरे बेटे, बेटे होने से मेरे उत्तराधिकारी नहीं होंगे ;
जो मेरे उत्तराधिकारी होंगे वो मेरे बेटे होंगे !"
~ हरिवंश राय बच्चनAbhishek तुम मेरे उत्तराधिकारी हो – बस कह दिया तो कह दिया !
— Amitabh Bachchan (@SrBachchan) March 23, 2022
या ट्विटवर चाहत्यांनी कमेंट्सचा पाऊस पाडला आहे. चाहत्यांनीही खूप कौतुक केले आहे. कमेंट करताना एका चाहत्याने लिहिले – भाऊ, एक नंबर, तर दुसऱ्या चाहत्याने लिहिले की तुम्ही मन जिंकले आहे. दीपिका पदुकोणने तिच्या इन्स्टा स्टोरीवर ट्रेलर टाकून अभिषेकचे कौतुक केले आहे. तर तिकडे अजय देवगणने स्तुतीसुमने उधळली आहेत. दरम्यान, हा चित्रपट 7 एप्रिल रोजी OTT प्लॅटफॉर्म Netflix वर प्रदर्शित होणार आहे.