Kareena Kapoor । अभिनेत्री करीना कपूरला बॉलीवूडमध्ये २४ वर्ष पूर्ण झाले आहे. तिला बॉलीवुडची ग्लैमरस डीवा म्हणून ओळखले जाते. पण एक वेळ अशी होती ज्यावेळी करीनाचा अभिनय प्रेक्षकांना आवडत नव्हता सुरुवातीच्या काळात तिचे अनेक चित्रपट फ्लॉप गेले.
मात्र तिने तिच्या अभिनयावर काम करत खूप कमी वेळात प्रेक्षकांच्या मनात आपले स्थान निर्माण केले. आज तिचे लाखो चाहते आहे. फॅशन फिटनेसमुळे सोशल मीडियावर करीना नेहमीच चर्चेत असते.
सोशल मीडिया तिचा एक जुना व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यात ती ‘रिफ्यूजी’ चित्रपटाबाबत सांगत आहे. हा तिचा डेब्यू चित्रपट होता. या चित्रपटात अभिनेता अभिषेक बच्चनने सुद्धा लीड रोल साकारला आहे. या चित्रपट करिनाने अभिषेकसोबत रोमान्स करण्यास नकार दिला होता.’ एका मुलाखतीत करीना आणि अभिषेकने याबाबत खुलासा केला आहे.
अभिषेकने सांगितले होते की, शूटिंगदरम्यान जेव्हा करीनाला रोमँटिक सीन करण्यास सांगितले गेले तेव्हा तिने सांगितले की हे कसे शक्य आहे. तो माझ्या भावासारखा आहे. मग मी त्याच्याशी रोमान्स कसा करू शकते? करीना आणि अभिषेकचा हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फारशी कमाई करू शकला नाही.
सध्या करीना कपूर ‘क्रू’ चित्रपटामुळे चर्चेत आहे. ज्यामध्ये त्याच्यासोबत क्रिती सेनॉन आणि तब्बू दिसणार आहेत. याशिवाय या चित्रपटात दिलजीत आणि कपिल शर्मा यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. या चित्रपटातील अनेक गाणीही आऊट झाली आहेत. जो सध्या सोशल मीडियावर चांगलाच धुमाकूळ घालत आहे. याशिवाय करीना, तब्बू आणि क्रिती या तिघांनाही चाहत्यांनी पसंती दिली आहे.
हे वाचले का ? ‘मफलरवाला आत गेला, गळ्यात पट्टा …’ भाजपने सांगितला पुढचा ‘नंबर’ कोणाचा?