नाशिक – मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासह पुत्र अमित ठाकरे यांनी सध्या पक्षाच्या बांधणीवर लक्ष केंद्रित केलं आहे. अमित ठाकरे सध्या नाशिक दौऱ्यावर आहेत. परंतु ते नाशिक दौऱ्यावर येण्यापूर्वी मनसेतील माजी नगरसेवकांनी कार्यकर्त्यांसह शिंदे गटात प्रवेश केला. यामुळेच अमित ठाकरे नाशिकमध्ये आल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली होती. पक्ष बांधणीसाठी नव्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या पुढील वर्षी करणार असल्याचे अमित ठाकरे यांनी यावेळी स्पष्ट केले.
माध्यमांशी बोलताना अमित ठाकरे यांनी सध्या मनसेतून सुरु असलेल्या आऊटगोईंगबाबत भाष्य केलं. “लोक जात असले तरी आमच्याकडे रिप्लेसमेंट रेडी आहे,साहेबांना मानणारा एवढा मोठा वर्ग आहे की एखादे दोन गेले तर काही फरक पडत नाही, एक एक माणूस ओढून त्यांना काय मिळतंय मला माहित नाही” असं अमित ठाकरे माध्यमांशी बोलताना म्हणाले.
मला नाशिकला यायला आवडत,मी नाशिकला येण्यासाठी कारणच शोधत असतो.निवडणुकीची तयारी वेगैरे नाही तर पक्ष बांधणीसाठी आलो जानेवारी महिन्यात पुन्हा दौरा करणार आहे.असही अमित ठाकरे यांनी सांगितलं. अमित ठाकरे नाशिक दौऱ्यावर येण्यापूर्वी मनसेत सुरु झालेली पडझड चिंतेचा विषय होता. परंतु अमित ठाकरे यांनी याबाबत आपले स्पष्ट मत व्यक्त करत पक्षबांधणीवर लक्ष केंद्रित केले असलयाचे सांगितले. .