नाशिक – मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे सुपूत्र अमित ठाकरे यांनी बुधवारी टोलनाका फोडणाऱ्या कार्यकर्त्यांचा सत्कार केला. यावेळी त्यांनी सरकारला टोलनाक्यांवर तैनात बाउंसर्चची दादागिरी थांबवण्याचा इशाराही दिला.
“मनसेच्या कार्यकर्त्यांनी कोणताही विचार न करता माझ्यावरील प्रेमापोटी केसेस अंगावर घेतल्या. त्यांनी टोलनाका फोडला. ही खूप मोठी गोष्ट आहे. आता सर्वांना जामीन मंजूर झाला आहे,’ असेही ते म्हणाले.
अमित पुढे बोलताना म्हणाले की, टोलनाक्यावर जे बाऊंसर ठेवले जातात त्यांच्याकडून होणारी दादागिरी थांबली पाहिजे. हा मेसेज जाणे गरजेचे होते, हा आम्ही मुद्दाम दिला नसला तरी तो जाणे गरजेचे होते म्हणत त्यांनी मनसेच्या कार्यकर्त्यांची पाठराखण केली आहे.
आपण रोडसाठी टोलसोडून आठ ते दहा टॅक्स भरत असतो. मात्र, तरीही रोडची परिस्थिती काय असा सवाल अमित ठाकरेंनी यावेळी उपस्थित केला आहे.