#ATPCup : स्पेन-सर्बिया यांच्यात होणार अंतिम लढत

सिडनी : जागतिक पुरूष एकेरी टेनिस क्रमवारीत अनुक्रमे पहिल्या व दुस-या स्थानावर असणा-या रफाएल नदाल आणि नोव्हाक जोकोविच यांचे स्पेन आणि सर्बिया हे संघ एटीपी कप स्पर्धेच्या अंतिम फेरीमध्ये पोहचले आहेत.

स्पर्धेच्या उपांत्य फेरीमध्ये स्पेनने यजमान ऑस्ट्रोलियावर मात केली. स्पेनने ऑस्ट्रोलियाचा  २-० ने पराभव केला. स्पेनच्या रफाएल नदालने ऑस्ट्रोलियाचा अलेक्स डी मिनाॅरचा ४-६, ७-५, ६-१ असा पराभव केला तर दुस-या सामन्यात स्पेनच्या रोबर्टो बटिस्टा अगुटने ऑस्ट्रोलियाच्या  निक किर्गियोसचा ६-१, ६-४ असा पराभव केला.

दुसरीकडे उपांत्य फेरीत सर्बियाने रशियावर मात करत अंतिम फेरी गाठली. सर्बियाच्या जोकोविचने रशियाच्या डॅनिस मेदवेदेवला ६-१, ५-७, ६-४ असे नमवले तर दुस-या सामन्यात सर्बियाच्या डुसन लाचोविचने करेन खाचानोवचा ७-५, ७-६, ७-१ असा पराभव केला.

 

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.