पुणे पालिकेच्या रुग्णवाहिकांना ‘जीपीआरएस’ सिस्टिमच नाही

नियोजनात अडथळे : करोना साथीच्या सहा महिन्यांनंतरही वाहन विभागाचे दुर्लक्ष

पुणे – करोना रुग्णांना वेळेत रुग्णवाहिका उपलब्ध होत नाहीत. एवढेच नव्हे, तर मृतांच्या अंत्यसंस्कारसाठीही रुग्णवाहिका मिळवण्यासाठीही विलंब होत आहे. यावर आता महापालिकेने तातडीने पावले उचलत आहे. मात्र, या विस्कळीत सेवेला महापालिकेचाच वाहन विभाग कारणीभूत असल्याचे समोर येत आहे. नियोजनामध्ये तातडीने सुधारणा करण्याचे दिव्य कार्य प्रशासनाला करावे लागणार आहे.

रुग्णवाहिका वेळेत न मिळाल्याने रुग्णाचा मृत्यू झाल्याच्या अनेक तक्रारी करोना कालावधीत आल्या आहेत. तर, मृतांना अंत्यविधीस्थळी नेण्यासाठीही रुग्णवाहिका मिळत नाही.यानंतर नियोजनाच्या पातळीवर जागे झालेल्या प्रशासनाने मृतदेहांवरील अंत्यसंस्कारासाठी 20 रुग्णवाहिकांच्या ताफ्याचे नियोजन वाहन विभागाकडून विद्युत विभागाकडे देण्याचा निर्णय घेतला आहे.

या रुग्णवाहिकांचे क्रमांक, चालकांची नावे आणि संपर्क क्रमांकांची यादी विद्युत विभागाकडे सोपवण्यात आली आहे. परंतु यातील 20 पैकी 2 रुग्णवाहिका दुरुस्तीसाठी बंद असल्याचे समोर आहे. तर उर्वरित 18 पैकी 9 रुग्णवाहिकांना “जीपीआरएस सिस्टिम’च नसल्याचे निदर्शनास आले आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.