मुंबई – गायिका आणि अभिनेत्री केतकी माटेगावकरचे (Ketaki Mategaonkar) अनेकजण चाहते आहेत. ‘टाइमपास’ या चित्रपटातून केतकीने अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. या चित्रपटात तिच्यासोबत मुख्य भूमिकेत प्रथमेश परब मुख्य भूमिकेत होता. या चित्रपटात केतकीच्या ‘प्राजू’ नावाच्या भूमिकेला प्रचंड लोकप्रियता मिळाली. मात्र आता केतकी तिच्या एका जाहिरातीमुळे चर्चेत आली आहे. या जाहिरातीत तिला सुपरस्टार अभिनेता अल्लू अर्जुनसोबत काम करण्याची संधी मिळाली आहे.
केतकीने अल्लूसोबत केलेली जाहिरात इनस्टाग्रामवर शेअर करत तिच्या भावना व्यक्त केल्या आहेत. केतकीने अल्लूसोबत रेड बसची जाहिरात केली आहे. केतकीने पोस्ट शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘अल्लू अर्जुनच्या पहिल्या महाराष्ट्रासाठी बनवण्यात आलेल्या जाहिरातीत महाराष्ट्राच्या संस्कृतीचं प्रतिनिधीत्व करण्याची संधी मला मिळाली याचा मला अभिमान वाटतो. अल्लू अर्जुनबरोबर पहिल्यांदा काम करण्याची संधी मिळाल्याने मी खूपच आनंदी आहे. हा दुर्मिळ योग जुळवून आणल्याबद्दल आभार.’
View this post on Instagram
ही जाहिरात पाहून अनेकांनी केतकीचे कौतुक केले आहे. ‘अप्रतिम… केतकी तुझ्यावर अभिमान आहे,’ ‘पुष्पा भाऊ… केतकी अभिमान आहे तुझा,’ अशा कमेंट नेटकऱ्यांनी केल्या आहेत. तर जाहिरात हिंदी भाषेत बनवण्यात आल्यामुळे अनेकांनी केतकीला ट्रोलही केलं आहे. ‘मराठीत जाहिरात केली असती तर खूप छान झाल असतं,’ असे म्हणत काही नेटकऱ्यांनी नाराजीही व्यक्त केली आहे.