इंदापूर: सोनाई प्रतिष्ठानच्यावतीने इंदापूर तालुक्यातील रेडा गावात प्रविण माने यांच्याहस्ते १६० अन्नधान्याचे किट वाटण्यात आले. सामाजिक बांधिलकी हेच आपलं आद्य कर्तव्य मानत, येणाऱ्या प्रत्येक अडचणींना जनसामान्यांच्या सोबत सदैव उभे राहत आपलं सोनाई प्रतिष्ठान सदैव कार्यरत असते, अगदी आत्ता संपूर्ण जगावर ओढवलेल्या कोरोना सारख्या महामारीच्या प्रादुर्भावातही आपले समाज सेवेचे व्रत आपण जोपासले आहे.
देशभरात लॉकडाऊनचा निर्णय घेण्यात आला. मनुष्याच्या जीविताच्या दृष्टीने हा निर्णय सदैव योग्यच आहे, परंतु श्रमजीवी बांधवांचा अर्थिक कणा मात्र यामुळे डळमळीत झाला आहे. व अश्या साऱ्या समाज बांधवांना मदत म्हणून आपल्या इंदापूर तालुक्यातील रेडा या गावी नागरिकांना अन्नधान्याच्या १६० किटचे वाटप करण्यात आले.
याप्रसंगी उपसरपंच जालिंदर, ना. देवकर, सचिन आ. देवकर, सरपंच भिमराव यादव, ब्रम्हदेव देवकर, धनंजय माने, मारुती मोहिते, तानाजी देवकर, उमराव देवकर, तानाजी भोसले, उत्तम सोपान देवकर, देविदास पडळकर, भारत पवार, सिध्देश्वर देवकर, सोमेश्वर देवकर, पोलीस पाटील संतोष भोसले, भाऊसाहेब घोगरे, गणेश वाघ, भैय्या मोरे आदी मान्यवर उपस्थित होते.