वारजे: कोरोनाच्या संकटाला सामोरे जात असताना नागरिकांच्या सुरक्षेसाठी शासकीय यंत्रणा, पोलीस कर्मचारी आपला जीव धोक्यात घालून आज आपले कर्तव्य बजावत आहेत. अशा या काळात आपल्या जीवाची पर्वा न करता काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांमध्ये शिवसंग्राम संघटना पुणे शहरच्या वतीने फेस शील्ड चे वाटप करण्यात आले.
पुणे शहर व खडकवासला मतदारसंघातील वारजे, नांदेड फाटा, वडगाव पुल, नवले पुल, राजाराम पुल, शिवणे, उत्तमनगर, कोंढवे धावडे, येथील पोलिस, ग्रामपंचायत महानगरपालिका, पी एम पी एल कर्मचारी यांना ‘फेस शील्ड’ देण्यात आली. संघटनेचे अध्यक्ष विनायक मेटे यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे शहराध्यक्ष भरत लगड, समीर निकम, किरण ओहोळ, केतन महामुनी, संजय लोंढे यांनी पुढाकार घेत हा उपक्रम राबवला. जे या संकटात दिवस रात्र नागरिकांच्या सुरक्षेसाठी काम करत आहेत त्यांच्या सुरक्षेचा विचार करून हा उपक्रम घेतल्याचे लगड यांनी सांगितले.