बेंगळुरू: “ऑल फिमेल क्रू” ने चालविलेली ऑक्सिजन एक्सप्रेस ट्रेन जमशेदपूरहून मेट्रिक टन वैद्यकीय ऑक्सिजनसह बेंगळुरूला आली, अशी माहिती रेल्वे मंत्री पियुष गोयल यांनी आज दिली.
“कर्नाटकला जाणारी सातवी ऑक्सिजन एक्सप्रेस शुक्रवारी टाटानगर (जमशेदपूर )हून बेंगळुरूला आली आहे,” असे गोयल यांनी सांगितले.
गोयल यांनी ट्विट केले की, सर्व महिला कर्मचाऱ्य्ांमार्फत चालविण्यात आलेली ही ऑक्सिजन एक्सप्रेस ट्रेन राज्यात कोविड रूग्णांना ऑक्सिजनचा निरंतर पुरवठा सुनिश्चित करेल.
The 7th #OxygenExpress to Karnataka has arrived in Bengaluru from Tatanagar.
This Oxygen Express train piloted by an all female crew will ensure continued supply of Oxygen for COVID-19 patients in the State. pic.twitter.com/UFWgKwVyuZ
— Piyush Goyal (मोदी का परिवार) (@PiyushGoyal) May 22, 2021
रेल्वेच्या म्हणण्यानुसार, या ऑक्सिजन एक्सप्रेसने पहाटे 109.2 मेट्रिक टन द्रव वैद्यकीय ऑक्सिजन घेऊन गुजरातमधील जामनगरहून बेंगळुरू गाठली.
कर्नाटक सरकारने राज्यातील कोविडमधील वाढती प्रकरणे लक्षात घेऊन दररोज 1200 मेट्रिक टन ऑक्सिजनची मागणी केली आहे.