मुंबई – बॉलिवूडची पंगा क्वीन म्हणजेच अभिनेत्री ‘कंगना राणावत’ आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत असते. नुकतीच कंगना मुंबई हुन आपल्या घरी मनालीला रवाना झाली असून, ती घरी आपल्या कुटूंबीयांसोबत वेळ व्यतीत करत आहे.
तर दुसरीकडे कंगनाचा बॉडीगार्ड ‘कुमार हेगडे’ याच्या विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल झाला आहे. कुमार हेगडेच्या विरोधा एका ३० वर्षीय मेकअप आर्टिस्ट तरुणीनं तक्रार दाखल केली आहे. कुमारनं लग्नाच आश्वासन देऊन आपल्यावर बलात्कार केल्याचा आरोप या तरुणीनं केला आहे.
तरुणीनं आपल्या तक्रारीत म्हंटल आहे कि… कुमार हेगडेनं मला लग्नासाठी विचारणा केली होती. मात्र असं न होता कुमारनं मला लिव्ह इन रिलेशनशिपसाठी विचारलं होतं. आणि मी त्याला होकार देखील दिला होता. कारण कुमार माझ्याशी लग्न करेल असा मला विश्वास होता.
तक्रारीत पुढे म्हंटलं, तिनं कुमारसोबत शारिरीक संबंध ठेवण्यास नकार दिला होता. पण कुमारनं तिला असं करण्यास भाग पाडलं. एवढंच नाही तर आईच्या आजारपणाचं खोट कारण देऊन कुमारनं तिच्याकडून ५० हजार रुपये उधार घेतले होते. आणि त्यानंतर कुमारनं तिच्याशी संपर्क तोडला असल्याचं या तरुणीचं म्हणणं आहे.