पीएम मोदींसाठी तिन्ही खान एकत्रित?

सलमान खान, शाहरुख खान आणि आमिर खान यांना एकत्रित सिल्वर स्क्रीनवर पाहण्याची त्यांच्या चाहत्यांना दिर्घ काळापासून अपेक्षा आहे. पण, आतापर्यत कोणत्याही चित्रपट निर्मात्यांनी अशी स्क्रिप्ट तयार केली नाही, ज्यात हे तिन्ही खान एकत्रित दिसतील. मात्र, आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ते शक्‍य करून दाखविले आहे.
या तिन्ही अभिनेत्यांशी एक व्हिडिओसाठी पंतप्रधान मोदी यांनी संपर्क साधला आहे. देशात वाढत असलेल्या पिण्याच्या पाण्याची समस्या आणि जलप्रदुषण याबाबत जनजागृती आणि पाणी बचतीसह जल शक्‍ति अभियानाला प्रोत्साहन देण्यासाठीचा व्हिडिओ तयार करण्यात येणार आहे. यासाठी केंद्रीय मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांच्याशी हे तिन्ही अभिनेते अप्रोच झाले आहेत.
या अभियानात आमिर खान आणि अमिताभ बच्चन हे पूर्वीपासूनच सहभागी आहेत. आता क्रिएटिव्ह टीमने या तिन्ही स्टार कलाकारांना एकत्रित आणण्याची कल्पना मांडली आहे. यामुळे या अभिनयानाला अधिक प्रोत्साहन मिळेल, असे वाटते. पण याला तिन्ही खानकडून अद्याप दुजोरा मिळालेला नाही.

Leave A Reply

Your email address will not be published.