#AUSvIND : शरद पवारांचे ‘भारतीय संघा’च्या विजयावर ट्विट, म्हणाले…

ब्रिस्बेन – भारत आणि ऑस्ट्रेलियादरम्यान झालेल्या चार सामन्यांच्या मालिकेतील अखेरच्या कसोटी क्रिकेट सामन्यात भारताने तीन गडी राखून शानदार विजय मिळवला. या विजयासह भारताने बॉर्डर-गावसकर मालिका ( BorderGavaskarTrophy ) जिंकून इतिहास घडवला. मराठमोळ्या अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वात भारतीय संघाने ही कामगिरी केली. ‘गाबा’च्या मैदानावरील ऑस्ट्रेलियाचा अंजिक्य विजयरथ रोखत भारतानं ऐतिहासिक विजयाची नोंद केली.

भारतीय संघाच्या ऐतिहासिक विजयानंतर भारतीय संघावर सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत असून,  आयसीसीचे माजी अध्यक्ष आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार ( Sharad Pawar ) यांनीही एक ट्विट केलं आहे.

शरद पवारांनी ट्विटमध्ये म्हटले आहे, “गाबा खेळपट्टीवर 32 वर्षांनंतर ऑस्ट्रेलियन संघाला थरारक कसोटी सामन्यात धूळ चारणाऱ्या भारतीय संघाचे मनपूर्वक अभिनंदन! अजिंक्य रहाणेच्या संघाने बॉर्डर-गावस्कर कसोटी मालिका जिंकून नवा इतिहास घडवला. वेल डन…!

भारताच्या विजयानंतर पंतप्रधानांनी केले संघाचे अभिनंदन म्हणाले,…

दरम्यान, ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात 369 धावा केल्या आणि भारताने प्रत्युत्तरात 336 धावा केल्या. त्यामुळे पहिल्या डावात ऑस्ट्रेलियाने 33 धावांची आघाडी घेतली. त्यानंतर दुसऱ्या डावात ऑस्ट्रेलियाने 294 धावा करत भारताला विजयासाठी 328 धावांचे आव्हान दिले. भारतीय संघानं शुबमन गिल, चेतेश्वर पुजारा आणि ऋषभ पंत यांच्या फलंदाजीच्या जोरावर 328 धावांचं कठीण आव्हान पार केलं आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.