आलिया भट बनली “मोस्ट डिजायरेबल वुमन’

आलिया भट आपल्या प्रोफेशनल आणि पर्सनल अशा दोन्ही गोष्टींबाबत नेहमीच चर्चेत असते. आता आलियाने बॉलिवूडमधील दीपिका, प्रियांका, कतरिना, जॅकलीन फर्नाडिस, श्रद्धा कपूर आणि दिशा पाटणीसारख्या हिरोईनला मागे टाकून “मोस्ट डिजायरेबल वुमन 2018’चा किताब पटकावला आहे.

2017 मध्ये हा किताब दीपिका पदुकोणच्या नावे होता. आता तो आलिया भटच्या नावे झाला आहे. आलिया भटला जेंव्हा तिच्या मते बॉलिवूडमधील “मोस्ट डिजायरेबल मॅन’ आणि वुमन होण आहे, असे विचारले गेले तेंव्हा तिने करीना कपूर आपली “ऑल टाईम फेव्हरेट ऍक्‍ट्रेस’ आणि रणबीर कपूर “मोस्ट डिजायरेबल ऍक्‍टर’ असल्याचे सांगितले.

आपण कधी काही “मोस्ट डिजायरेबल’ चा किताब मिळवू शकू असे आपल्याला कधीही वाटले नव्हते. मोस्ट डिजायरेबल बनण्यासाठी आपल्यामध्ये असे काय आहे, हे देखील आपल्याला माहित नसल्याचे ती म्हणाली. एखाद्या माणसाठी पूर्ण पर्सनॅलिटी जर आपल्याला पसंत पडली, तरच तो “मोस्ट डिजायरेबल’ वाटू शकतो, असे आलिया म्हणाली. आपण स्वतः एक अत्यंत पारदर्शी स्वभावाची व्यक्‍ती आहे आणि लोकांना ही गोष्ट दिसत असल्याचे समाधानही आहे, असे आलिया म्हणाली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)