इम्रान खान घेणार काडीमोड

बॉलिवूडमधील आणखी एक सेलिब्रेटी जोडपे घटस्फोटाच्या मार्गावर आहे. प्रसिद्ध अभिनेता आमीर खानचा भाचा आणि “जाने तू या जाने ना’ यासारख्या चित्रपटात झळकलेला अभिनेता इम्रान खान काडीमोड घेणार असल्याची माहिती आहे. आठ वर्षांच्या संसारानंतर इम्रान पत्नी अवंतिका मलिकपासून विभक्त होणार असल्याचे बोलले जात आहे.

दोघांमधील तीव्र मतभेदामुळे आम्ही आमच्या नात्याला विराम देण्याचा निर्णय घेतला आहे, असे अवंतिकाने सांगितले आहे. अवंतिकाने काही दिवसांपूर्वीच मुलगी इमारासोबत इम्रानचे “पाली हिल’मधील घर सोडले. सध्या ती माहेरी राहत असल्याची माहिती आहे. परंतु दोघांनीही अद्याप घटस्फोटाच्या वृत्ताला दुजोरा दिलेला नाही.

इम्रान आणि अवंतिका यांची वयाच्या 19 व्या वर्षी भेट झाली होती. काही वर्ष डेटिंग केल्यानंतर दोघे लॉस अँजेलसमध्ये लिव्ह इन रिलेशनशीपमध्ये राहत होते. दहा वर्षांच्या ओळखीनंतर 2011 मध्ये ते विवाहबंधनात अडकले. 2014 त्यांच्या मुलीचा जन्म झाला. तिचे नामकरण इमारा मलिक खान असे करण्यात आले.
इम्रान आणि अवंतिका यांनी कोर्ट मॅरेज केले होते. “मी मुस्लिम आहे, तर अवंतिका हिंदू कुटुंबातील आहे. त्यामुळे एका धर्माचे रितीरिवाज पाळून लग्न करण्याचे मला वैयक्तिकरित्या पटत नव्हते. त्यामुळे न्यूट्रल म्हणून मी कोर्ट मॅरेजचा पर्याय निवडला’ असे इम्रान म्हणाला होता.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)