आलिया भटचा आज 27 वा वाढदिवस आहे. वाढदिवसानिमित्त त्याची फ्रेन्ड सर्कल आणि फॅन्सकडून तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होतो आहे. तिचे हे बर्थ डे सेलिब्रेशन काल मध्यरात्रीपासूनच सुरू झाले. या सेलिब्रेशनचे फोटो, व्हिडीओ तिने सोशल मिडीयावर शेअर करायला सुरुवात केली.
त्यातील एका व्हिडीओमध्ये आलिया एकाचवेळी दोन केक कापतानाचाही एक व्हिडीओ आहे. हे दोन्ही केक तिच्या मैत्रिणींकडून आणण्यात आले गेले होते. त्यांच्याबरोबर आलियाने खूप एन्जॉयही केला. बी टाऊनमधून सोशल मीडियाच्या माध्यमातून आलियाला खूप शुभेच्छा संदेश मिळत आहेत.
धक धक गर्ल माधुरी दीक्षितनेही आलियाला शुभेच्छा दिल्या आहेत.तर आलियाची मम्मा सोनी राझदाननेही आलियाचा लहानपणचा फोटो शेअर करून खूपच गोड शब्दात आपल्या लेकीला शुभेच्छा दिल्या आहेत.
उडता पंजाब, हायवे, राजी आणि गली बॉयमधून आपल्या ऍक्टिंग स्कीलची छाप सोडलेली आलिया सध्या ब्रम्हास्त्रमध्ये रणबीर कपूर आणि अमिताभ बच्चन यांच्या बरोबर काम करते आहे. हा सिनेमा याच वर्षी 4 डिसेंबरला रिलीज होणार आहे.