भारतीय शेअर बाजाराला कोरोनाचा आजही फटका

सेन्सेक्‍स 1688 तर निफ्टी 432 अंकांनी घसरला

मुंबई : जागतिक बाजारपेठेवर कोरोना विषाणूचा परिणाम होताना दिसत आहे. तर आज पुन्हा एकदा कोरोनाचा फटका मुंबई शेअर बाजार आणि राष्ट्रीय शेअर बाजारात दिसला. या दोन्ही शेअर बाजारांच्या निर्देशांकात सोमवारी सुरुवातीच्या सत्रात मोठी घसरण झाली.


मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्‍स सोमवारी बाजार उघडताच 1688 अंकांनी घसरला. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 432 अंकांनी घसरला. जागतिक बाजारांमध्ये शेअर्सच्या विक्रीचा सपाटा सोमवारीही कायम राहिला. अमेरिकेतील फेडरल रिझर्व्ह बॅंकेने प्रमुख व्याजदरात कपात केली आहे. त्याचबरोबर कोरोना विषाणूचे जगात वेगाने संक्रमण होईल, अशी चिंता व्यक्त केली आहे. त्याचा परिणाम सोमवारी सकाळी भारतीय बाजारांमध्ये दिसला.

अमेरिकी डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपयामध्ये घसरण झाल्याचे सोमवारी सकाळी दिसले. एक डॉलरसाठी 74.11 रुपये इतके मोजावे लागणार असल्याचे सोमवारी सकाळी दिसले. शुक्रवारी डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपया 73.91 एवढ्यावर होता.

Leave A Reply

Your email address will not be published.