मुंबई : राष्ट्रीय तपास यंत्रणेकडून मुंबई पोलिसांना सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला असल्याची माहिती समोर आली आहे. त्यासाठी एनआयएने मुंबई पोलिसांना एक ई-मेल पाठवला असल्याचे सांगण्यात येत आहे. या मेलमध्ये मुंबईत सध्या एका संशयास्पद व्यक्तीचा वावर असल्याचा उल्लेख करण्यात आला आहे. एनआयएने दिलेल्या इशाऱ्यानंतर राज्यातल्या तपास यंत्रणा सतर्क झाल्या आहेत.
मुंबईत एक धोकादायक व्यक्ती फिरत असून त्यासंदर्भातील माहिती देणारा ई-मेल एनआयएकडून मुंबई पोलिसांना करण्यात आला आहे. NIA कडून मुंबई पोलिसांनी पाठवण्यात आलेल्या ई-मेलमध्ये सतर्क राहण्याचा आणि सावधगिरी बाळगण्याचा इशारादेण्यात आला आहे. एनआयएकडून ई-मेल आल्यानंतर तपास यंत्रणा सतर्क झाल्या आहेत.
NIA ने आपल्या ईमेलमध्ये ‘धोकादायक’ या शब्दाचा उल्लेख करत मुंबई पोलिसांना सतर्क राहायला सांगितले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, NIA ने आपल्या ई-मेलमध्ये सरफराज मेमन असे या व्यक्तीचे नाव असून ही व्यक्ती परदेशात प्रशिक्षण घेऊन आलेली असून धोकादायक असल्याने सतर्क राहावं अशा सूचना एनआयएने केल्याचे सांगण्यात येत आहे.
मुंबईत फिरत असलेली संशयित धोकादायक व्यक्ती इंदूरची राहणारी असून या व्यक्तीने चीन, हाँगकाँग आणि पाकिस्तानमध्ये ट्रेनिंग घेतली आहे. त्यामुळे ही व्यक्ती खूपच धोकादायक ठरु शकते, असेही एनआयएने म्हटले आहे. एनआयकडून मुंबई पोलिसांना करण्यात आलेल्या ई-मेलमध्ये या संशयित व्यक्तीची कागदपत्रही पाठवली आहेत. मेलसोबत NIA ने आधार कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, पासपोर्ट आणि एलसी कॉपीही जोडल्या आहेत. दरम्यान, यासंदर्भात मुंबई पोलिसांनी इंदूर पोलिसांसोबतही संवाद साधत सविस्तर माहिती दिली आहे.