आळंदी – संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीच्या वतीने विश्रांतवड येथे ओपन जिम उभारण्यात आली आहे. या जिमचे लोकार्पण मारुती महाराज कुरेकर यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी आळंदी नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा वैजयंता उमरगेकर, प्रमुख विशस्त योगेश देसाई, विश्वस्त ऍड. विकास ढगे पाटील, व्यवस्थापक ज्ञानेश्वर वीर, आळंदी पोलीस ठाण्याचे बापुसाहेब जोंधाळे, माजी सभापती डी. डी. भोसले, साहेबराव कुऱ्हाडे, अजित वडगावकर, योगिराज कुऱ्हाडे, नंदकुमार वडगावकर, मंगेश आरु, विष्णू कुऱ्हाडे, शिवाजी भोसले आदी मान्यवर उपस्थित होते.