शिक्रपूर – पिंपळे खालसा (ता. शिरूर) येथील एकाने आत्महत्या केली. त्याच्या प्रेयसीवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी शिक्रापूर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल केला आहे. अमोल राजेंद्र धुमाळ (वय 38 रा. पिंपळे खालसा) असे आत्महत्या केलेल्याचे नाव आहे. तर आरती अमोल धुमाळ (वय 34 रा. पिंपळे खालसा) यांनी फिर्याद दिली आहे.
अमोल धुमाळचे लग्न झालेले असून देखील त्याची एका महिलेशी ओळख झाली होती, काही काळाने दोघांच्या ओळखीचे रुपांतर प्रेमात झाले. त्यांनतर अमोल संबंधित महिलेसोबत मुंबई येथे राहत होता. दरम्यान, दोघांनी लग्न देखील केले. तर नुकतेच फेब्रुवारी 2022 मध्ये अमोल त्याच्या मूळगावी आलेला होता, त्यावेळी तो मानसिक तणावात होता. दि. 21 फेब्रुवारी रोजी अमोने विषारी औषध प्राशन केले होते.
त्यास रुग्णालयात नेले, यावेळी अमोलने त्याच्या पत्नीकडे एक चिठ्ठी दिली होती. त्यांनतर अमोलचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला; मात्र अमोल याच्या पत्नीकडे दिलेली चिठ्ठी त्याच्या कुटुंबीयांनी पाहिली असता त्यामध्ये संबंधित महिलेने बरबाद केले असल्याने तिच्यामुळेच आत्महत्या करीत असल्याचे चिठ्ठित नमूद केले असल्याचे फिर्यादित नमूद केले आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक अमोल खटावकर करीत आहे.