जुन्नर-जुन्नर शहराजवळील अलदरे या छोट्याशा गावातील ग्रामस्थांनी ग्रामदैवताची यात्रा रद्द झाल्यामुळे जमलेले 51 हजार रुपये मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये जमा केले आहेत. सध्या सर्वत्र लॉकडाऊन असल्यामुळे यात्रा रद्द करण्यात आल्या आहेत. मात्र काही मोजकीच गावे ही वर्गणी करोनाविरुद्धच्या लढ्यात देऊन आपले राष्ट्रीय कर्तव्य निभावत आहेत. जुन्नर येथील निवृत्त शिक्षक पद्माकर महाजन यांनी 20 हजार तसेच म्हसोबा देवस्थान ज्येष्ठ नागरिक संघ, अलदरे यांनीही 11 हजार रुपयांची मदत मुख्यमंत्री निधीत जमा केली आहे. मदतीचा धनादेश तहसीलदार हनुमंत कोळेकर व नायब तहसीलदार सचिन मुंढे यांच्याकडे सोपविण्यात आला.