वाल्हे-करोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर होत असल्याने खबरदारीचा उपाय म्हणून वाल्हे गाव तसेच गावाजवळील 12 वाड्या-वस्त्या दि. 18 व 19 रोजी दोन दिवस पूर्ण बंद राहणार आहे. यापूर्वीही करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सावधगिरीचा उपाय म्हणून वाल्हे गाव तसेच परिसरामधील वाड्या – वस्ती 12 ते 14 एप्रिल पूर्ण बंद ठेवण्यात आले होते.
या दोन दिवसामध्येही ग्रामस्थांनी प्रतिसाद द्यावा, असे आवाहन जिल्हा बॅंकेचे माजी अध्यक्ष प्रा. डॉ. दिगंबर दुर्गाडे, सरपंच अमोल खवले, उपसरपंच सूर्यकांत भुजबळ, ग्रामविकास अधिकारी बबन चखाले यांनी केले आहे. बंदच्या काळात गावातील सरकारी व खासगी दवाखाने, मेडिकल्स, वगळून सर्व दुकाने 100 टक्के दुकाने बंद असणार आहेत. स्वस्त धान्य दुकाने मात्र या वेळी सुरू राहतील. संचारबंदीबाबत कडक सूचना देऊन नियम मोडणाऱ्यावर गुन्हे दाखल करणार असल्याचे वाल्हेचे पोलीस हवालदार हनुमंत गार्डी यांनी सांगितले.