अक्षयचा “केसरी’ जपानमध्ये रिलीज होणार

भारतात बऱ्यापैकी धंदा केलेल्या अक्षयच्या “केसरी’ला आता आंतरराष्ट्रीय पातळीवर यशस्वी होण्याचे वेध लागले आहेत. “केसरी’ आता जपानमध्ये रिलीज होतो आहे. केवळ 7 दिवसांमध्ये 100 कोटींच्या क्‍लबमध्ये दाखल होणारा “केसरी’ 16 ऑगस्टला जपानमध्ये रिलीज केला जाणार आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात, 1897 साली शीख सैनिकांच्या शौर्यावर आधारीत या सिनेमात अक्षय कुमारबरोबर परिणिती चोप्राही लीड रोलमध्ये आहे.

“बॅटल ऑफ सारंगी’ नावाने ओळखल्या जाणाऱ्या युद्धात केवळ 21 शीख योद्धयांनी तब्बल 10 हजार अफगाण सैन्याचा मुकाबला केला होता. ही 21 शूर सैनिकांची पलटण आता जपानच्या मोहिमेवर निघाली आहे, असे अक्षयने ट्विटरवरच्या पोस्टमध्ये म्हटले आहे. भारतात “केसरी’ रिलीज झाला, तेंव्हा पहिल्याच दिवशी 21 कोटींचा धंदा झाला होता.

सलमानचा “भारत’ रिलीज होण्यापूर्वीचा हा या वर्षीचा सर्वात मोठे ओपनिंग देणारा सिनेमा ठरला आहे. “केसरी’ जपानमध्ये रिलीज होण्याशिवाय अक्षयकडे आणखीन काही महत्वाच्या गोष्टी शेअर करण्यासारख्या आहेत. “गुड न्यूज’, “मिशन मंगल’ आणि “सूर्यवंशी’ हे त्याचे सिनेमे एकापाठोपाठ एक करत रिलीज होणार आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.