अक्षय कुमारचा “बेल बॉटम’ थिएटरमध्ये रिलीज नाही

अक्षय कुमारचा “बेल बॉटम’ थिएटरमध्ये रिलीज केला जाणार नाही, अशी माहिती मिळते आहे. यामुळे अक्षयच्या चाहत्यांची निराशा होणार आहे. लॉकडाऊनमुळे संपूर्ण फिल्म इंडस्ट्री 8 महिन्यांसाठी बंद होती. लॉकडाऊननंतर “बेल बॉटम’च्या निमित्ताने एखाद्या नवीन प्रोजेक्‍टवर काम करणारा अक्षय हा पहिला कलाकार आहे. त्याने या सिनेमाचे बहुतेक शूटिंग लंडनमध्ये संपवले आहे.

निर्मात्यांचा खर्च वाचवण्यासाठी अत्यंत थोड्या वेळात “बेल बॉटम’चे शूटिंग पूर्ण होईल, याची त्याने काळजी घेतली आहे. आता सिनेमा थिएटरऐवजी ऍमेझॉन प्राईमवर रिलीज होणार असल्याची घोषणाही त्याने केली आहे. “बेल बॉटम’ 2 एप्रिलला थिएटरवर रिलीज केला जाणे अपेक्षित होते. मात्र, अक्षयचा “सूर्यवंशी’ जवळपास वर्षभरापासून रखडला आहे. हा सिनेमादेखील थिएटरमध्ये रिलीज करायचे ठरले होते.

आता “बेल बॉटम’देखील थिएटरवर रिलीज करायचे असले तर निर्मात्यांना थोडे अडचणीचेच ठरले असते. त्यामुळेच “बेल बॉटम’ थिएटरऐवजी ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज करण्याचा निर्णय घेतला गेला. “बेल बॉटम’मध्ये अक्षयबरोबर वाणी कपूर, हुमा कुरेशी आणि लारा दत्तादेखील असणार आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.