मुंबई – ९० च्या दशकात खिलाडी अक्षय कुमार आणि अभिनेत्री रविना टंडन यांची ऑन स्क्रीन आणि ऑफ स्क्रिन केमिस्ट्री चांगलीच चर्चेत आली होती. त्यांच्या अफेर्सच्या अनेक बातम्या आजही चर्चेत येत असतात. त्या काळात चर्चेत आलेल्या जोड्या पैकी काहीजण त्यांच्या नात्याला नाव देऊ शकले, तर काहींचे नाते सुरू झाल्यानंतर लगेच ब्रेकअप झाले.
मग वर्षानुवर्षे एकमेकांना भेटले नाही. वर्षांनंतर त्यांनी एकत्र स्क्रीन शेअर करून चाहत्यांना आश्चर्यचकित केले. यापैकी एक म्हणजे अक्षय कुमार आणि रवीना टंडनची जोडी. एकेकाळी दोघांच्या प्रेमाची खूप चर्चा झाली होती. पण रिलेशनशिप तुटल्यानंतर ते एकत्र दिसले नाहीत. अशात आता बातमी आहे की जवळपास 20 वर्षांनंतर त्यांची जोडी पुन्हा एकदा स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे.
रिपोर्टनुसार, अक्षय कुमार आणि रवीना टंडनची जोडी ‘वेलकम 3’मधून स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे. ही जोडी एकत्र येण्यासाठी 20 वर्षे लागली. ‘वेलकम-3’च्या निर्मात्यांनी ते शक्य करून दाखवले. ‘वेलकम’च्या तिसऱ्या भागाचे शीर्षक ‘वेलकम टू जंगल’ असे असेल. हा एक साहसी विनोदी चित्रपट आहे. दोन्ही स्टार्सना चित्रपटाची स्क्रिप्ट आवडली आहे.
निर्माते फिरोज नाडियादवाला ‘वेलकम 3’ची निर्मिती करणार आहे. तो 2024 मध्ये ख्रिसमसच्या मुहूर्तावर प्रदर्शित होणार आहे. अक्षय कुमारशिवाय संजय दत्त आणि परेश रावल मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. यासोबतच सुनील शेट्टी, जॅकलिन फर्नांडिस आणि दिशा पटानी यांच्याही प्रमुख भूमिका आहे. मोठ्या स्टारकास्टला एकत्र पाहण्यासाठी चाहते खूप उत्सुक आहेत.