Entertainment – मराठमोळा अभिनेता संकर्षण कऱ्हाडे अभिनयासह दिग्दर्शनम लिखाण, कविता आणि सूत्रसंचालन या गोष्टींमध्ये देखील सरस आहे. त्याच्या याच शैलीने त्याने प्रेक्षकांच्या मनात घर निर्माण केले आहे. सोशल मीडियावर संकर्षण सक्रिय असतो. सोशलवर तो त्याने अनुभव शेअर करत असतो. अशात शेअर केलेल्या एका फोटोमुळे पुन्हा एकदा त्याची सर्वत्र चर्चा रंगू लागली आहे. संकर्षणाने विमान प्रवासाचा भन्नाट अनुभव शेअर सोशलवर शेअर केला. त्यासोबत दोन फोटोही त्याने पोस्ट केलेत. यात तो पायलटच्या शेजारी बसलेला दिसून येतो. (entertainment, television, Marathi cinema,Sankarshan Karhade )
संकर्षणने लिहिले आहे की,’ माझा हा अनुभव वेळ असेल तर; नक्की वाचा ..” कॅनसास सिटी हून क्लिव्हलॅंड ला जाण्यासाठी विमानांत शिरलो तर फार गर्दी नव्हती.. विमान ऊडतं कसं , कसं चालवतात, ह्याच्याविषयी मनांत कायम प्रश्नं पडलेले असतात म्हणुन दरवेळी मी विमिनांत बसतांना कुतूहलाने केबीनकडे बघतोच.. आजही तेच केलं.. (entertainment, television, Marathi cinema,Sankarshan Karhade )
तर; हे “पायलट साहेब” (आपल्याकडच्या ड्रायव्हर साहेब , कंडक्टर साहेब सारखं म्हणतोय) जरा मोकळे ढाकळे वाटले …. माझ्याकडे बघुन , स्वत:हून हसले .. आपल्याला “ऊडवून नेणारा पायलट” आपल्याला स्वत:हून स्माईल देतोय म्हणल्यावर हेच मोफत स्माईल दूपटीने परत करायला कसला भाव खायचा ..? म्हणुन मी त्यांच्यापेक्षा जास्तं मोकळा ढाकळा हसलो.. आणि त्याच्या केबीनकडे
“काय भाऊ ; येऊ का घरांत….??” च्या नजरेनेच पाहिलं .. त्यालाही ते कळलंच..
त्याने मग स्वत:हून “Welcome to my working area” असं म्हणाल्यावर मी फार फार खुष झालो गड्या.. पहिल्यांदाच विमानाच्या केबिनमध्ये पाय ठेवला.. जिथुन २००/३००/४०० लोकांना घेऊन हि विमानं ऊडत असतात…. खूप सारे बटन्स, पायलटची खुर्ची , माॅनिटर , टेक आॅफ लॅंडिंग ची ती दांडी .. मज्जा वाटली पाहातांना .. मला झालेला एकंदरीत आनंद पाहाता तो परत स्वतःहून म्हणाला ; “सिट देअर अॅंड क्लिक अ पिक्चर” …. मी पाहातच राहिलो .. मला प्रश्नं पडला कि , हा माझ्या चेहरऱ्यावरचा अती आनंद पाहून मनांत मला वेड्यात काढून माझी गंमत करतोय का ..?? मग मी जरा कंट्रोल्ड वागायची अॅक्टींग करत “No no .. Its ok….” वगैरे म्हणालो तर “कॅप्टन पिटर रसल भाऊंनी” आग्रहाने पायलट सिटवर बसवलं….. आणि माझा फोटो घेतला .. आर काय आनंद झाला म्हणुन सांगू ….?? …. लोकंहो विचार करा …. जरा स्माईल दिलं , प्रेमानं बोललं कि , मनांत असलं ते सगळं होतंय …. आज विमानाचं केबिन पाहिल्यामुळे मी मात्रं “हवेत आहे” असं लिहत त्याने आपलं अनुभव शेअर केला आहे.
दरम्यान, संकर्षणच्या वर्क फ्रंटबाबत सांगायचे झाल्यास, सध्या त्याचा ‘संकर्षण वाया स्पृहा’ या कार्यक्रम जोरदार सुरू आहे. लवकरच त्याचा ‘तीन अडकून सीताराम’ हा चित्रपट भेटीस येणार आहे. (entertainment, television, Marathi cinema,Sankarshan Karhade )