Akanksha Puri – ‘बिग बस OTT 2’ द्वारे प्रसिद्धीच्या झोतात आलेल्या ‘आकांक्षा पुरी’चे (Akanksha Puri) फोटो आणि व्हिडिओ अनेकदा सोशल मीडियावर व्हायरल होतात. अभिनेत्री नेहमीच तिचे फोटो वेगवेगळ्या स्टाइलमध्ये शेअर करत असते.
अलीकडेच आकांक्षा पुरीने (Akanksha Puri) एका इव्हेंटमध्ये भाग घेतला जिथे तिने अशा स्टाईलचे कपडे घातले होते की सगळीकडेच तिच्या सौंदर्याची जादू पसरली होती.
हा व्हिडीओ दिवाळी पार्टीमधील असल्याचे सांगितले जातंय. मात्र, या लूकमध्ये आकांक्षा पुरी ही अत्यंत बोल्ड दिसत आहे. आकांक्षा पुरी हिच्या या व्हिडीओनंतर इंटरनेटचा पारा चांगलाच वाढल्याचे दिसत आहे.
View this post on Instagram
यावेळी अभिनेत्रीने पारंपरिक आणि मॉर्डन लूक असणार ड्रेस परिधान केला होता. या आऊटफिटमध्ये आकांशा कमालीची हॉट आणि ग्लॅमर्स दिसत होती. नेटकरी देखील तिच्या फिटनेस आणि सौंदर्याचे दिवाने झाले होते.
व्हिडीओवर अनेकांनी कमेंट करत म्हटले की, दिवाळी पार्टीला कशाला अशाप्रकारचे प्रदर्शन हवे? दुसऱ्याने लिहिले की, किती जास्त बोल्ड आहे ही आकांक्षा पुरी. चाहते या व्हिडीओवर फिदा झाल्याचे बघायला मिळतंय.
आकांक्षा पुरी हिने तिच्या आतापर्यंतच्या करिअरमध्ये अनेक शोमध्ये काम केले. फक्त शोच नाही तर आकांक्षा पुरी हिने काही चित्रपटांमध्ये देखील महत्वाच्या भूमिका या केल्या आहेत.