नागपूर – विधानसभेत कामकाजाला सुरूवात होताच विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी राज्यातील विकास कामांना स्थगिती दिल्याप्रकरणी सरकारला जाब विचारला. ही कामे कर्नाटक की गुजरातमधील आहेत का असा संतप्त सवाल विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी करत ईडी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला.
यानंतर महाविकास आघाडीच्या आमदारांनी वेलमध्ये उतरत सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. “नही चलेगी नही चलेगी, तानाशाही नही चलेगी… स्थगिती सरकार हाय हाय…५० खोके एकदम ओके” अशा घोषणांनी सभागृह अक्षरशः दणाणून सोडले.
दरम्यान,हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विधानभवन परिसरातील शिवसेना कार्यालयासाठी ठाकरे गट आणि शिंदे गटात जुंपली. अधिवेशनाच्या सुरुवातीला शिवसेनेच्या एकाच कार्यालयात उद्धव ठाकरे गट आणि एकनाथ शिंदे गटाचे कार्यालय असल्याचे दृश्य दिसत होते.