नीलकंठ मोहिते
इंदापूर तालुक्याच्या इतिहासात पहिल्यांदाच उपमुख्यमंत्री अजित पवार
कार्यकर्ते सोडून बैठक करणार
इंदापूर : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे व माजी मंत्री आमदार दत्तात्रय भरणे यांचे ऋणानुबंध जवळचे राजकीय संबंध संपूर्ण राज्याला माहिती आहेत.तर अजित पवार यांचा आवडता राजकीय तालुका इंदापूर आहे. त्यामुळे येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते,व आमदार दत्तात्रय भरणे मोठं शक्तीस्थळ अजित पवारांचे मानले जाते.परंतु उपमुख्यमंत्री अजित पवार महायुतीमध्ये सामील झाल्यामुळे,व महायुतीच्या उमेदवार म्हणून सुनेत्रा अजित पवार यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्याने,इंदापूर तालुक्याच्या इतिहासात पहिल्यांदाच उपमुख्यमंत्री अजित पवार
कार्यकर्ते सोडून इंदापूर शहरात शुक्रवार (ता.19 एप्रिल)रोजी भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्ते पदाधिकारी बैठकीस संबोधित करणार आहेत.बैठक करणार आहेत.त्यामुळे या बैठकीचा आगामी काळात राजकीय फायदा होणार की तोटा ? यावर चर्चा रंगत आहेत. भाजप नेते माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी मागील सहा महिन्यापासून,लोकसभा निवडणुकी संदर्भात वातावरण गरम केले आहे.त्यामुळे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी थेट इंदापूर तालुक्यात येऊन हर्षवर्धन पाटील व त्यांच्या कार्यकर्त्यांची समजूत काढली.हर्षवर्धन पाटील यांचे कार्यकर्ते काही झाले,तरी विधानसभेला आम्हाला मदत करा असा आग्रह आजपर्यंत करत आहेत.तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासाठी अवघड जागेचे दुखणे होऊन बसले आहे.विद्यमान आमदार दत्तात्रय भरणे यांनी कित्येक कोटीचा निधी इंदापूर तालुक्याच्या विकासासाठी आणून, तालुका विकासमय केला आहे.
त्यामुळे इंदापूर तालुक्यातील सर्वच गावात गेल्यावर जी विकास कामे दिसतायेत,सुरू आहेत,ती बघताच आमदार दत्तात्रय भरणे यांना विकासाच्या बाबतीत जनता क्रेडिट देत आहे.याच विकास कामांच्या जोरावर लोकसभा निवडणुकीत सुनेत्रा पवार यांना आमदार दत्तात्रय भरणे यांच्या माध्यमातून,मोठे समर्थन मिळणार आहे.मागील दोन दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीइंदापूर शहरात दौरा केला आणि कचा कचा बटन दाबा,द्रोपदी या शब्दावर राज्यभर राजकीय गदारोळ उडाला.अजित पवार इंदापुरात आले की एकदम फ्री बोलतात.मात्र त्याचे पडसाद राज्यभर उमटतात हे जुनेच गणित आहे.
त्यामुळे रोखठोक असणारे उपमुख्यमंत्री अजित पवार भारतीय जनता पार्टीच्या आयोजित केलेल्या मेळाव्यात हर्षवर्धन पाटील यांना कोणता शब्द देणार ?माजी मंत्री विजय बापू शिवतारे यांचे राजकीय सांत्वन अजित पवार करण्यामध्ये यशस्वी ठरले आहेत.मात्र इंदापूर तालुक्याचा प्रश्न अत्यंत वेगळा आहे.यातून अजित पवार काय मार्ग काढणार याकडे मात्र तालुक्याचे लक्ष लागले आहे.
” मंत्रिमंडळात संधी नाही तरीही अजित पवारांना साथ ”
आमदार दत्तात्रय भरणे हे तालुक्यातील जाहीर सभेत उघडपणे सांगतात.जो विकास झाला आहे तो फक्त उपमुख्यमंत्री अजित पवारांमुळे,मध्यंतरी अजित पवार यांनी राज्य सरकारला समर्थन देण्याची भूमिका घेतली.तब्बल सहा खात्याचे मंत्री म्हणून काम केलेले आमदार दत्तात्रय भरणे यांनी,अजित पवारांच्या भूमिकेला समर्थन देत,मंत्रिपद न मिळताही अखंड साथ अजित पवार यांचेबरोबर ठेवलेली आहे.त्यामुळे काही झाले तरी,आमदार भरणें यांच्या पाठीशी उपमुख्यमंत्री अजित पवार आगामी काळात ठाम राहतील हे मात्र निश्चित.