मुंबई : शरद पवार यांच्या भेटीला अजित पवार हे सिल्वर ओक या निवासस्थानी दाखल झाले आहे. तेथे त्यांचे सुप्रिया सुळे यांनी स्वागत केले. ते तेथे पोहोचल्यावर त्यांनी दरवाजा बंद करून घेतला.
राष्ट्रवादीचे नेते अजित पवार परत यावे म्हणून प्रयत्न केले जात होते. त्यावेळी अजित पवार यांनी त्याना दाद दिली नव्हती. मात्र कधीही राजकारणात न पावलेले सुप्रिया सुळे यांचे पती सदानंद आणि आई प्रतिभाताई यांनी तू घरी ये म्हणून सांगितले. त्यामुळे अजित पवार यांचे मन द्रवले. असे पवार कुटुंबीयांच्या निकटवर्तीयांनी सांगितले.
मात्र घरी पोहोचताच ते धावतच तेथे पोहोचले. त्यावेळी गाडीतून उतरताच ते धावत घरात आले. त्यामुळे शरद पवार यांच्या कुटुंबातील वाद मिटल्याचे मानले जात आहे. मात्र शरद पवार त्यांना पक्षात काय स्थान देतात हे पाहणे गरजेचे आहे.