श्रीनगर : काश्मीर खोऱ्यातील स्थितीचा आढावा घेण्यासाठी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल बुधवारी येथे दाखल झाले. जम्मू-काश्मीरचा विशेष राज्याचा दर्जा रद्द करण्यात आल्यानंतर डोवाल यांचा हा दुसरा दौरा आहे.
जम्मू-काश्मीरचे विभाजन दोन केंद्रशासित प्रदेशांमध्ये केले जाणार आहे. त्यानुसार जम्मू-काश्मीर आणि लडाख हे स्वतंत्र केंद्रशासित प्रदेश 31 ऑक्टोबरपासून अस्तित्वात येतील. त्यादृष्टीने सरकारी योजनांची अंमलबजावणी केली जाणार आहे. त्यादृष्टीने आगामी काळात उचलण्यात येणाऱ्या पाऊलांबाबत निर्णय घेण्याच्या दृष्टीने डोवाल यांचा दौरा महत्वपूर्ण ठरेल. ते वरिष्ठ सुरक्षा अधिकाऱ्यांशी चर्चा करून स्थितीचा आढावा घेतील.