Maharashtra Heatwave – गेल्या दोन दिवसांत अकोला हे महाराष्ट्रातील सर्वात उष्ण शहर ठरले आहे. ज्यात ४५ अंश सेल्सिअसपेक्षा जास्त तापमानाची नोंद झाली आहे. तसेच अकोल्यात उष्णतेच्या लाट येण्याची शक्यता आहे.
ही शक्यता लक्षात घेता, जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी कलम १४४ लागू केले आणि सार्वजनिक ठिकाणी लोकांना एकत्र येण्यास मनाई केली आहे.
महाराष्ट्राच्या विदर्भात असलेल्या अकोला शहरात शुक्रवारी ४५.८ अंश सेल्सिअस आणि शनिवारी ४५.६ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. हे या महिन्यातील शहरातील मोसमातील सर्वोच्च तापमान आहे, अशी माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे.
यापूर्वी २६ मे २०२० रोजी, अकोला हे ४७.४ अंश सेल्सिअस तापमानात (मध्य प्रदेशातील खरगोननंतर) देशातील दुसरे सर्वात उष्ण शहर होते.