Mare Nostrum Swim Tour 2024 :- भारताचा अनुभवी जलतरणपटू श्रीहरी नटराजने फ्रान्समध्ये सुरू असलेल्या 30व्या मेयर नॉस्ट्रम जलतरण स्पर्धेत 50 मीटर बॅकस्ट्रोकमध्ये रौप्य पदक जिंकले.
🏊♂️Proud moment for 🇮🇳 at the Mare Nostrum Swim Tour! #TOPSchemeAthlete Srihari Nataraj bags🥈in the Men’s 50m Backstroke Final A with an timing of 00:25.50! 🌊#Swimming@srihari3529 pic.twitter.com/eXwU4y0ueW
— SAI Media (@Media_SAI) May 25, 2024
टोकियो ऑलिम्पिकमध्ये खेळलेल्या नटराजने या स्पर्धेत 25.50 सेकंद वेळ नोंदवली आणि हंगेरीच्या ॲडम जास्जोनंतर दुसरे स्थान पटकावले. ॲडम जास्जोने 25.46 सेंकद वेळ नोंदवली. श्रीहरीचे सुवर्णपदक थोडक्यात हुकले. ब्रिटनच्या स्कॉट गिब्सन यानं 25.64 सेंकद अशी वेळ नोंदवत तिसऱ्या स्थानासह कांस्यपदक पटकावले.
या प्रकारात नटराजची वैयक्तिक सर्वोत्तम कामगिरी 25.11 सेकंद आहे. 50 मीटर बॅकस्ट्रोक ही ऑलिम्पिक स्पर्धा नाही. पॅरिस ऑलिम्पिकसाठी अद्याप एकही भारतीय जलतरणपटू पात्र ठरलेला नाही. यापूर्वीच्या टोकियो ऑलिम्पिकसाठी साजन प्रकाश आणि नटराज पात्र ठरले होते.