चिन्मयानंद भाजपचा नाहीच!

लखनौ ः विद्यार्थिनीवर बलात्कार केल्याच्या आरोपाखाली अटक झालेला भाजपचा माजी केंद्रीय मंत्री स्वामी चिन्मयानंद याच्याशी पक्षाचा कोणताही संबंध नाही येवढेच नव्हे तर तो भाजपाचा साधा सदस्यही नाही असे म्हणत त्यांना या प्रकरणात एकाकी सोडले.

भापजचे प्रवक्ते हरिश्‍चंद्र श्रीवास्तव यांनी ‘पीटीआय’ला ही माहिती दिली. स्वामी चिन्मयानंद हे भाजपचे सदस्य नाहीत. आमचे सर्व रेकॉर्डस आता डिजिटल स्वरूपात उपलब्ध आहेत. त्यामुळे आम्ही या दाव्यासह सांगतो की, ते आमच्या पक्षाचे सदस्य नाहीत. चिन्मयानंद हे तीन वेळा भाजपच्या तिकीटावर उत्तर प्रदेशमधून निवडून आले होते. अटलबिहारी वाजपेयी मंत्रीमंडळअत त्यांनी राज्यमंत्री म्हणून काम पाहिले होते.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.