बॉलिवुड अभिनेता अजय देवगण याने काल (सोमवारी) राजस्थानमधील अजमेरला भेट दिली होती. यावेळी त्योन मुलगा युग देवगणसह अजमेर शरीफ दरगाहला गेला होता. याप्रसंगी अजय हा अजमेरला दाखल होताच चाहत्यांनी एकच गर्दी केली. त्यामुळे एकच गोंधळ उडाला आणि धक्का-बुक्की होण्याचा प्रसंग घडला. या प्रसंगामुळे अजय दुखावला असून त्याने नाराजी व्यक्त केली आहे.
अजमेर येथे घडलेल्या या घटनेचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यात आपल्या आवडत्या अभिनेत्याची एक झलक पाहण्यासाठी बेताब झालेले चाहते दिसत आहेत. यात चाहत्यांनी अजय देवगणला चारही बाजूने घेराव घातल्याचे दिसते. दरम्यान, अजय देवगणच्य वर्कफ्रंटबाबत सांगायचे झाल्यास शेवटच्यावेळी तो “दे दे प्यार दे’मध्ये झळकला होता. यात त्याच्यासोबत तब्बू आणि रकुल प्रीत सिंह झळकल्या होत्या. आता अजय देवगण आपल्या आगामी “तानाजी ः द अनसंग वॉरियर’ चित्रपटात काम करत आहे. यात त्याच्याशिवाय सैफ अली खानही काम करत आहे. हा चित्रपट पुढील वर्षी जानेवारीत प्रदर्शित होणार आहे.