मुंबई – मेगास्टार अमिताभ बच्चन यांची सून आणि अभिनेता अभिषेक बच्चन यांची पत्नी अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन अडचणी सापडल्या आहे. कोर्टाने त्यांना नोटीस पाठवली आहे. ही नोटीस कर थकबाकीच्या बाबतीत आहे. अशात ऐश्वर्या राय बच्चनच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आडवाडीच्या डोंगराळ भागात ऐश्वर्या यांची सुमारे 1 हेक्टर जमीन असल्याची माहिती मिळत आहे. याच जमिनीच्या एका वर्षाच्या कराचे 22 हजार थकल्याने ऐश्वर्याला नोटीस पाठण्यात आली आहे. ऐश्वर्यासोबत 1200 इतर मालमत्ता धारकांना देखील ही नोटीस पाठण्यात आली आहे. मार्च अखेरीस वसुलीचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी महसूल विभागाकडून ही कारवाई करण्यात आली आहे.