Aira Khan Wedding : लेकीच्या आनंदात आपला आनंद मानणाऱ्या सुपरस्टार आमिर खानने, कन्या आयरा खान हिचे लग्न एका मध्यमवर्गीय मराठी कुटुंबात लग्न करून आपल्या लेकीचा आनंद हा त्याच्याकरता त्याचे ‘स्टार’ असण्याहून अधिक महत्त्वाचा आहे, हे दाखवून दिले आहे.
बॉलिवूडचा ‘मिस्टर परफेक्शनिस्ट’ अर्थात आमिर खान सध्या त्याची मुलगी आयरा खान आणि नुपूर शिखरे यांच्या विवाहाच्या धामधुमीमुळे चर्चेत आला आहे. वडील म्हणून आमिर खानकरता हा अत्यंत जीवालगतचा खास आणि भावनिक क्षण आहे. आपली मुलगी आयरा हिच्या आयुष्यातील सर्वात मोठा आणि सुंदर क्षण संस्मरणीय बनवण्यात आमिरने कोणतीही कसर बाकी ठेवली नाही. त्याने पिता म्हणून आपले कर्तव्य यथासांग पार पाडले आणि लेकीच्या लग्नाची जय्यत तयारी केली. यासोबतच आमिर खानने मध्यमवर्गीय कुटुंबातून आलेल्या नुपूर शिखरेच्या कुटुंबाचाही मान राखला.
आमिर खान जरी बॉलीवूडमधील सर्वात बड्या सुपरस्टार्सपैकी एक असला, तरी त्याच्या लेकीच्या लग्नात स्वत:चा ‘स्टार’ दर्जा बाजूला सारत, त्याने नुपूर शिखरेच्या कुटुंबाचा योग्य तो आदर राखला आणि यथोचित सन्मान केला. नुपूर हा मध्यमवर्गीय कुटुंबातील असून तो व्यवसायाने फिटनेस ट्रेनर आहे. नुपूर हा आयराचाही प्रशिक्षक होता आणि याच दरम्यान दोघे परस्परांच्या प्रेमात पडले, त्यानंतर दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. कोणताही ‘स्टेटस’चा बडगा न दाखवता, आमिर खानने लेकीच्या प्रेमाला कोणताही आक्षेप घेतला नाही व नुपूर आणि आयरा यांच्या लग्नाला रूकार दिला. आमिरने शिखरे कुटुंबाचे त्याच्या कुटुंबात आनंदाने स्वागत केले.
इतकेच नाही तर त्यांनी शगुनची मेहंदी आणि हळदी समारंभ वर कुटुंबासोबत साजरा करण्याचा निर्णय घेतला. त्या समारंभात आमिरच्या घरच्या प्रत्येक महिलेने मराठी प्रथेनुसार नाकात नथ घातली होती, केसात गजरा माळला होता आणि त्यांनी पारंपरिक दागिने परिधान केले होते. आमिरच्या कुटुंबातील प्रत्येक महिला शिखरे महिलांसारखीच पारंपरिक पद्धतीची नऊवारी साडी नेसेल, हे त्याने सुनिश्चित केले. लग्नाआधीच्या समारंभांच्या छायाचित्रांतून ते दिसूनही आले. निशा, गौरी, रीना, आमिर खान, निखत (बहीण), लक्ष्मी, लीना आणि फरहत (बहीण) या आमिरच्या कुटुंबियांच्या छायाचित्रांतून ते प्रतिबिंबित झाले. आमिरच्या मुलीचे लग्न मराठी कुटुंबात झाल्याने आमिरने वर कुटुंबाने सांगितल्यानुसार सर्व काही केले.
वधूच्या वडिलांची भूमिका यथासांग पार पाडणारा हा मेगास्टार लग्नात आवश्यक ती सर्व तयारी करताना दिसला. वराच्या कुटुंबाच्या इच्छेनुसार त्याने मराठी परंपरेनुसार प्रत्येक विधी पार पाडला.
हे स्पष्ट आहे की, आमिर खानने त्याच्या मुलीवरच्या मायेला आणि लेकीच्या आनंदाला सर्वाधिक महत्त्व दिले आहे. आमिर खरोखरीच एक एक पिता म्हणून सर्वोत्तम आणि परिपूर्ण आहे व आमिरचे हे काळजीवाहू पित्याचे आणि लेकीच्या आनंदात आपला आनंद मानणाऱ्या अवताराने आयरा खानच्या भव्य लग्न सोहळ्यात सर्वांनाच मोहित केले. आमिरने व्यक्तिगत पातळीवर हे सुनिश्चित केले की, संपूर्ण लग्नसोहळ्यात वर कुटुंबाला कुठेही कमीपणा वाटता कामा नये.