मेलबर्न – भारताचा स्टार टेनिसपटू सुमित नागलने मंगळवारी(दि.16) ऑस्ट्रेलियन ओपन ग्रॅंडस्लॅम टेनिस स्पर्धेच्या पहिल्याच फेरीत दमदार कामगिरी करत इतिहास रचला आहे. त्याने या स्पर्धेत ३१ व्या मानांकित अलेक्झांडर बुबलिकचा सनसनाटी पराभव केला.
सुमित नागल सुरुवातीपासूनच दोन सेटमध्ये आघाडीवर होता, आणि तिसऱ्या फेरीतही त्याने चमकदार कामगिरी करत बुबलिकचा पराभव केला. सुमित नागलने हा सामना 6-4, 6-2, 7-6 असा जिंकला. गेल्या ३५ वर्षात भारतीय पुरुष टेनिसपटूने एकेरी ग्रँड स्लॅममध्ये मानांकित खेळाडूला पराभूत करण्याची ही पहिलीच वेळ आहे.
That’s a big win for @nagalsumit 🇮🇳
He takes out No. 31 seed Bublik 6-4 6-2 7-6(5).#AusOpen • #AO2024 pic.twitter.com/ldM9VE4X0M
— #AusOpen (@AustralianOpen) January 16, 2024
सुमित नागलचे एटीपी रँकिंग १३७ आहे. नागलने भारतीय टेनिसमध्ये आपली एक ओळख निर्माण केली आहे. मात्र, जागतिक स्तरावर त्याला आत्ता मिळाले तसे यश यापूर्वी कधीही मिळालेले नव्हते, त्यामुळे तो या स्पर्धेत आणखी कीती प्रगती करतो हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
Australian Open 2024 : कोको गॉफ आणि सबालेन्काचा विजयी धडाका कायम…
दुखापतीतून पुनरागमन करताना नागलच्या कारकिर्दीतील हा सर्वात मोठा निकाल असेल. जर त्याने गुरुवारी जागतिक क्रमवारीत 140 व्या स्थानावर असलेल्या जुआनचेंग शांगविरुद्ध दुसरी फेरी जिंकली तर तिसऱ्या फेरीत त्याचा सामना जागतिक क्रमवारीत दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या कार्लोस अल्काराझशी होऊ शकतो.