मुंबई – विमानाच्या इंधन अर्थात एटीएफच्या दरात रविवारी आणखी 4.2 टक्क्यांनी वाढ करण्यात आली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ होत असताना या महिन्यात दुसऱ्यांदा एटीएफच्या किमती वाढवण्यात आल्या आहेत. यामुळे विमान प्रवासाच्या तिकिट दरात वाढ होण्याची शक्यता आहे.
सरकारी मालकीच्या पेट्रोलियम कंपन्यांच्या अधिसूचनेनुसार, दिल्लीतील एटीएफच्या किमती 3,232.87 रुपये प्रति किलोलीटर किंवा 4.25 टक्क्यांनी वाढून 79,294.91 रुपये प्रति किलोलीटर करण्यात आल्या आहेत. जानेवारी 2022 मधील एटीएफच्या किमतीतील ही दुसरी मोठी वाढ आहे. यापूर्वी 1 जानेवारी रोजी विमान इंधनाच्या किमतीत 2,039.63 रुपये प्रति किलोलीटर अर्थात 2.75 टक्क्यांनी वाढ करण्यात आली होती.