चंडलर – अमेरिकेत सिंगल इंजिनचे विमान आणि हेलिकॉप्टर यांची शुक्रवारी हवेतच धडक झाली. फिनिक्स एअरपोर्ट जवळ हा प्रकार घडला. या धडकेनंतर हेलिकॉप्टर शेतात पडले.
त्यामुळे हेलिकॉप्टर मध्ये बसलेले दोघेही ठार झाले. हेलिकॉप्टर पडल्याच्या घटनेमुळे जमीनीवरील कोणाला इजा झाली नाही, पण या विमानतळावरील वाहतूक मात्र कित्तेक तास बंद ठेवण्यात आली होती. ही दोन्ही विमान आणि हेलिकॉप्टर वेगवेगळ्या फ्लाईट स्कुलची होती.
यातील विमान हे फ्लाईट ऑपरेशन अकॅडमीचे होते. हे विमान चार आसनी होते. विमान प्रशिक्षक आणि विद्यार्थिच हे विमान चालवत असतात. हवेतील दुर्घटनेनंतर हे विमान विमानतळावर उतरवण्यात आले पण त्याच्या लॅंडिग गिअरची मोडतोड झाल्याचे निदर्शनाला आले आहे. विमान वाहतुक नियंत्रण कक्ष त्यावेळी कार्यरत असताना हा अपघात कसा झाला याची चौकशी केली जात आहे.