वायुदलाच्या जवानांची कौतुकास्पद कामगिरी; नदीत अडकलेल्यांचे वाचवले प्राण

नवी दिल्ली: जम्मूमध्ये तावी नदीत अचानक पाणी वाढल्याने 4 लोक अडकले होते. ज्यांना वायू दलाच्या जवानांनी हेलिकॉप्टरच्या सहाय्याने वाचवले. यातील दोन लोक बांधकाम करण्यासाठी पुलाजवळील भिंतीवर सुमारे दोन तास अडकले होते.

बचावचा पहिला प्रयत्न अयशस्वी झाला. बचावासाठी हेलिकॉप्टरमधून सोडलेला दोर तुटला होता आणि बचाव दलातील दोन जण वाहून गेले. मात्र, दोघांनाही सुखरुप वाचवण्यात आले. त्याचवेळी हेलिकॉप्टरने दुसरी दोरी सोडली आणि त्यानंतर अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यात आले.

जम्मूच्या विभागीय आयुक्तांनी तावी नदीवर चार लोक अडकल्याची माहिती भारतीय वायू दलाला दिली होती. हे चार लोक बांधकाम सुरू असलेल्या पुलावर अडकले होते. माहिती मिळाल्यावर वायुसेनेने तातडीने कारवाई केली आणि एमआय -१ हेलिकॉप्टर घटनास्थळी पाठविले.

 

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.

×