पश्चिम बंगाल – पश्चिम बंगाल मधील अलीपुरव्दारमध्ये एका जखमी बिबट्याला पाहण्यासाठी लोकांची प्रचंड गर्दी जमली होती. गर्दीमुळं घाबरलेला जखमी बिबट्या शांतपणे बसून होता. त्यामुळं जखमी बिबट्याचा जवळून फोटो काढण्याचा मोह अनेकांना आवरता आला नाही. गर्दीतील अनेक लोक बिबट्याचे फोटो काढत होते. तर काहीजण व्हिडीओ काढण्यात व्यस्त होते. इतक्यात बिबट्याने फोटो काढणाऱ्या गर्दीमधील एका व्यक्तीवर झडप घेतली आणि त्यानंतर त्या व्यक्तीसोबत काय झालं हे पाहण्यासाठी खालील व्हिडिओ पाहा….
दरम्यान, जखमी बिबट्याचा फोटो काढणं, संबंधित व्यक्तीला चांगलंच महागात पडलं आहे. सुदैवाने बिबट्याच्या हल्ल्यामध्ये तो किरकोळ जखमी झाला असला तरी यामध्ये त्याला जीव सुध्दा गमवावा लागला असता.
सध्या बिबट्याला वनविभागाने ताब्यात घेतले असून सध्या त्यावर उपचार चालू आहेत. उपचारानंतर त्याला जंगलात सोडण्यात येईल अशी माहिती वनविभागाने दिली आहे.