नगर – दिवाळी सणानिमित्त बाजारपेठाही सजल्या आहेत. नागरिकांमध्ये उत्साहाचं वातावरण असते, तसेच ग्राहकांची देखील विविध वस्तू खरेदीसाठी बाजारात लगबग पाहायला मिळतेय, फटाका मार्केट गजबजले आहे. ठिकठिकाणी बाजारात फटाक्यांची दुकानं पाहायला मिळतायत. फटाका मार्केटमध्ये पुन्हा एकदा फटाके प्रेमींनी गर्दी करायला सुरुवात केली आहे. यावर्षी फटाक्यांच्या किंमतीत 30 ते 40 टक्क्यांनी वाढ झाली असली तरी नागरिकांचा उत्साह मात्र कमी झालेला नाही.
नागरिकांचा खरेदीसाठी भरघोस प्रतिसाद
दिवाळी म्हटली की, फटाके हे आलेच. लहान मुलांपासून ते तरूणाई आणि वृद्धांपर्यंत सगळ्यांनाच फटाक्यांचा मोह काही आवरत नाही.
मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी फटाक्यांच्या किंमतीत तब्बल 30 ते 40 टक्क्यांनी वाढ झाली असली तरी मात्र, फटाके खरेदी करताना नागरिकांमध्येही मोठा उत्साह पाहायला मिळतोय.
प्रशासनाने रस्त्यावर फटाके विक्री करण्यास परवानगी दिली आहे. याचा नागरिकांच्या जीवितास फार मोठा धोका आहे. प्रशासन याबाबत गंभीरता घ्यायला तयार नाही. रस्त्यावर फटाके विक्री करून अपघात झाला तर याची जबाबदारी कोणावर स्फोटक नियमानुसार 15 फूट पत्र्याचं शेड पाण्याची गाडी, फायर ब्रिगेड गाडी सेक्युरिटी स्विच फायर टाक्या एवढं स्वरक्षण असताना आम्हाला परवाना भेटो रस्त्यावरील लोकांना कोणतीही व्यवस्था नसताना परवानगी कशी काय मिळते? हा गंभीर प्रश्न आहे. प्रशासनाने रस्त्यावर फटाके विक्री करणाऱ्या लोकांना परवानगी देऊ नये फटाका असोसिएशनच्या वतीने मागणी.
श्रीनिवास बोज्जा, फटका असोसिएशन सचिव