दुर्दैवी: भीषण अपघातात कंटेनरखाली दबून माय-लेकाचा मृत्यू; कुटुंबावर दु:खाचा डोंगर

शिरूर – शिरूर जवळ श्रीगोंदा तालुक्‍यातीलहद्दीत गव्हाणेवाडी येथे नगर-पुणे महामार्गावर भरधाव कंटनेर दुचाकीवर उलटल्याने कंटेनरखाली दबून झालेल्या अपघातात राळेगणसिद्धी (ता. पारनेर) येथील आई व मुलाचा जागीच मृत्यू झाला आहे.

रविवारी सकाळी साडेसहाच्या सुमारास पुण्याच्या दिशेने भरधाव जाणारा कंटेनर दुभाजक तोडून नगर रस्त्यावर उलटला. त्यावेळी शिरूरवरून दुचाकीवर स्वप्नील बाळू मापारी (वय 27) व त्यांची आई लक्ष्मीबाई बाळू मापारी (वय 62) हे राळेगण सिद्धीला घरी परतत होते.

यावेळी अचानक दुभाजक तोडून कंटेनर (एमएच 46 एएफ 0272) थेट त्यांच्या अंगावरच उलटला. या अपघातात कंटेनरखाली दबले गेल्याने मायलेकाचा मृत्यू झाला. अपघातानंतर नगर-पुणे महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती. त्यानंतर क्रेनच्या साहाय्याने कंटेनर बाजूला काढून मृतदेह बाहेर काढण्यात आले. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन कंटेनर बाजूला करीत मृतदेह बाहेर काढून घटनेचा पंचनामा केला.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.