जामखेड – जिल्ह्याचे जेष्ठ नेते तथा श्रीगोंद्याचे आमदार बबनराव पाचपुते यांची आमदार प्रा. राम शिंदे यांनी सदिच्छा भेट घेतली. पाचपुते यांच्या निवासस्थानी दोन्ही माजी पालकमंत्र्यांमध्ये तब्बल 40 मिनिटे प्रदीर्घ चर्चा झाली.
आमदार प्रा. राम शिंदे हे 26 जानेवारी रोजी श्रीगोंदा तालुका दौर्यावर होते. या दौर्यात ते एका खासगी कार्यक्रमाला उपस्थित राहणार होते. तत्पूर्वी आमदार प्रा.राम शिंदे यांनी जिल्ह्याचे ज्येष्ठ नेते आ. बबनराव पाचपुते यांची सदिच्छा भेट घेतली.
पाचपुते कुटुंबीयांनी आमदार शिंदे यांचा यथोचित सन्मान करत स्वागत केले. आमदा शिंदे यांनी आमदार पाचपुते यांच्या तब्येतीची आस्थेवाईकपणे विचारपूस केली. या सदिच्छा भेटीत आमदार प्रा.राम शिंदे व आमदार बबनराव पाचपुते या दोन्ही नेत्यांमध्ये तब्बल 40 मिनिटे प्रदीर्घ चर्चा झाली. दोन्ही नेत्यांनी विविध विषयांवर दिलखुलास संवाद साधला. शिंदे व पाचपुते हे दोन्ही नेते जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आहेत. दोन्ही माजी पालकमंत्र्यांमध्ये आज प्रदीर्घ चर्चा झाली. या भेटीचा सविस्तर तपशील समजू शकला नाही.