छत्रपती शिवाजी महाराज चौकात भगवा हातात घेऊन मिरवणूक
मंचर : अंतरवाली सराटी येथे आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील व समस्त समाज बांधव यांनी मागील सात महिन्यांपासून जो लढा उभारला होता त्याला यश मिळाले. त्या विजय प्रत्ययार्थ आंबेगाव (ता. आबेगाव) येथे सकल मराठा समाजाच्या मान्यवरांनी भगवा झेंडा हातात घेत गावातून मिरवणूक काढून जल्लोष केला.
घोडेगाव येथील अहिल्यादेवी चौकात छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार करीत छत्रपती शिवाजी महाराज की जय, एक मराठा लाख मराठा, जरांगे पाटील आगे बढो हम तुम्हारे साथ है अशा घोषणा देण्यात आल्या.
मराठा समाज व जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला यश मिळाले असून मराठा समाजाला आरक्षण मिळण्याचे मार्ग मोकळे झाले आहेत. मराठा समाजाला आरक्षण मिळाल्यास मराठा समाजातील तरुणांचे नोकरीचे, शिक्षणाचे प्रश्न मार्गी लागणार आहेत, घोडेगावचे उपसरपंच सोमनाथ काळे यांनी सांगिले.
याप्रसंगी भीमाशंकर कारखान्याचे संचालक अक्षय रामशेठ काळे, आंबेगाव तालुका विद्या विकास शिक्षण मंडळाचे अध्यक्ष तुकाराम काळे, वैभव काळे, गोविंद काळे, विशाल भगत, वैभव काळे, प्रशांत काळे, पंकज काळे, विशाल दरेकर, विनायक काळे, नरेंद्र काळे, कपिल काळे, महेश काळे, विनोद काळे, शिवदास काळे, वैभव बोऱ्हाडे, कचर पाटील गव्हाणे, विलास आप्पा काळे, सीताराम काळे, परशुराम भेके, महिंद्रा काळे यासह मराठा बांधव उपस्थित होते.