नगर -शारदीय नवरात्रोत्सवाला उद्या पासून सुरूवात होत आहे. शहरातील केडगाव रेणुका माता मंदिर उत्सवासाठी सज्ज झाले आहे. मंदिरात रंगरंगोटी व विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. खेळणीचे दुकाने आदींची रेलचेल पाहायला मिळते केडगाव मंदिरात नवरात्रीच्या काळात रात्रंदिवस गर्दी असते, मंदिरात दर्शनासाठी महिलांसाठी व पोलिसांसाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे. दिव्यांगासाठी व्हील चेअर ची व्यवस्था तसेच ज्यांना वेळेअभावी व अन्य अडचणीमुळे रांगेत उभे राहून दर्शन घेणे शक्य नाही. अशांसाठी मुख् दर्शनाची सोयही करण्यात आली आहे. ऊन वाऱ्यापासून संरक्षण व्हावे यासाठी होमकुंडावर पत्र्याचे छत उभे करण्यात आले आहे.
कोणताही अनुचित प्रसंग घडू नये यासाठी मंदिर परिसरात अनेक ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहे. याशिवाय दुचाकी आणि चार चाकी वाहनांसाठी वाहन तळाची व्यवस्था करण्यात आली आहे. केडगाव येथे सातव्या माळेला देवीची यात्रा भरत असते. यात्रेच्या निमित्ताने दोन्ही ठिकाणी खेळण्याची साधने बसवण्यात आल्याने सुरुवातीपासूनच यात्रेचे स्वरूप अनुभवायला मिळणार आहे. उत्सवावर नियंत्रण राहण्यासाठी केडगाव येथे तात्पुरती पोलीस चौकी उभारण्यात येते तसेच भाविकांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था ही करण्यात आली आहे . अशी माहिती मंदिराचे पुजारी शेखर गुरव यांनी दिली आहे. महापालिकेच्यावतीने रस्त्यांचे पंचिंग व आजूबाजूचे अतिक्रमण हटविले आहे.
महिलांसाठी विशेष सोय
महिलांसाठी व पोलिसांसाठी स्वतंत्र रांगा राखीव पाण्याची उत्तम सोय पुरुषांसाठी वेगळी रांग आहे. मुख दर्शनाची उत्तम सोय करण्यात आली आहे. दिव्यांगासाठी व्हील चेअर ची व्यवस्था करण्यात आली आहे.
विद्युत रोषणाई मंदिर सजले
मंदिर परिसरात विद्युत रोषणाई व रंगरंगोटीने मंदिर नटले आहे. दुकाने आदींची रेलचेल सुरु आहे.