नगर (प्रतिनिधी) – जय हिंद सैनिक सेवा फाऊंडेशन व वृक्षबॅंकेच्या वतीने माजी सैनिक जिल्हाभर वृक्षरोपण व संवर्धन अभियान राबवित आहेत. त्या अंतर्गत ससेवाडी (ता. नगर) येथील सीना नदीच्या उगमस्थानी असलेल्या सिनाशंकर महादेवाच्या मंदीर परिसरात काल माजी सैनिकांतर्फे वृक्षारोपण करण्यात आले.
या निसर्गरम्य परिसरात उपस्थितांनी देशी व औषधी वृक्षांची लागवड केली. प्रहारचे प्रदेश उपाध्यक्ष संतोष पवार, सरपंच संजय ससे, सचिन पेंडभाजे, नवनाथ ससे, विष्णू ससे, बाबासाहेब जरे, रोहित मगर, मोहित मगर, सुरज मगर, सौरभ मगर, सोमनाथ मगर, शौर्यराज मगर, जय हिंदचे शिवाजी पालवे, संतोष मगर, संजय पाटेकर, मयुर नवगिरे आदी उपस्थित होते.
संतोष पवार म्हणाले, “”माजी सैनिक पर्यावरण संवर्धनासाठी जय हिंद सैनिक सेवा फाऊंडेशनच्या माध्यमातून राबवित असलेले उपक्रम प्रेरणादायी आहे. माजी सैनिकांनी उभी केलेली वृक्षबॅंक समाजाला दिशा देणारी ठरणार आहे. सीना नदी नगरची ओळख आहे. त्यामुळे तिचे उगमस्थान असलेला परिसर आणखी निसर्गरम्य करण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात आला.” यावेळी संतोष मगर यांनी
आभार मानले.