लोणी – पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्याचा सन 2023-24च्या 74व्या गळीत हंगामाचा प्रारंभ उद्या (बुधवार) सकाळी 10 वा. कारखाना कार्यस्थळावर आयोजित केल्याची माहिती कारखान्याचे अध्यक्ष कैलासराव तांबे यांनी दिली.
महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शालिनीताई विखे पाटील यांच्या हस्ते व माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आणि खा. डॉ. सुजय विखे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत गळीत हंगामास प्रारंभ होणार आहे.
या वेळी प्रवरा अभिमत विद्यापीठाचे कुलपती डॉ. राजेंद्र विखे पाटील, प्रवरा सहकारी बॅंकेचे अध्यक्ष भास्करराव खर्डे, ट्रक्स वाहतूक सोसायटीचे अध्यक्ष नंदूशेठ राठी, चेअरमन गीताताई थेटे, भाजपचे जिल्हाध्यक्ष विठ्ठल लंघे, तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर गोंदकर उपस्थित राहणार असल्याचे कैलासराव तांबे यांनी सांगितले. या गळीत हंगाम प्रारंभाप्रसंगी ऊस उत्पादक शेतकरी, सभासदांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन उपाध्यक्ष सतीश ससाणे, कार्यकारी संचालक अमोल पाटील यांनी केले आहे.